11 जानेवारी चालू घडामोडी नोट्स
■ स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
● स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.
● राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले.
● 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवड पहिल्या आणि लोणावळा तिसऱ्या स्थानी राहिले. याशिवाय कराड, पाचगणी & विटा या शहरांनीही स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले.
● 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूरने सलग सातव्यांदा पहिला पुरस्कार मिळवला, तर नवी मुंबईला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
● कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सप्ततारांकित’ मानांकन मिळविणाऱ्या देशातल्या 2 शहरांपैकी एक नवी मुंबई आहे. हागणदारीमुक्त श्रेणीत सर्वोच्च ‘वॉटरप्लस’मानांकनही नवी मुंबईने कायम राखले आहे.
● पुणे महानगरपालिकेला 5 स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला 5 स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 8 शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
● स्वच्छ सर्वेक्षणात सुमारे 4.5 हजार शहरातल्या 1 लाख ठिकाणांची पाहणी झाली आणि 12 कोटी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याची माहिती नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.
● गेल्या 10 वर्षात वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापनाचे प्रमाण 16 वरुन 76 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.
■ आशियाई नेमबाजी स्पर्धेत पदक तालिकेत 19 पदकांसह भारत पहिल्या क्रमांकावर
● आशियाई नेमबाजी स्पर्धेत पदक तालिकेत 19 पदकांसह भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
● त्यात 7 सुवर्ण, 6 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे.
● चीन 10 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
● आज महिलांच्या गटात रिदम सांगवानने 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक पटकावले.
● या बरोबरच रिदमने पॅरीस येथे होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत स्थान पक्क केले आहे.
● आतापर्यंत ऑलंपिक कोट्यात भारताच्या 16 खेळाडुंचे स्थान पक्के झाले आहे.
● या आधी वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी 14 वे आणि 15 वे स्थान पक्के केले होते.
■ चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 17 लाख कोटी रुपयांहून जास्त
● चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 17 लाख कोटी रुपयांहून जास्त झाले आहे.
● गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे 17 टक्केने जास्त आहे.
● हे संकलन 2023-24 या वर्षासाठीच्या एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या ऐंशी टक्के आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
● कॉर्पोरेट आयकराचा वृद्धीदर 8.32 % तर व्यक्तिगत आयकराचा वृद्धीदर 26 % हून अधिक आहे.
● यावर्षी आतापर्यंत 2 लाख 48 हजार कोटी रुपये परताव्यापोटी दिले गेले आहेत.
■ पहिली भारतीय बनावटीची मेमरी चिप गुजरातमध्ये तयार होण्याची शक्यता
● पहिली भारतीय बनावटीची मेमरी चिप यावर्षी गुजरातमध्ये तयार होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सागितले आहे.
● ते आज व्हायब्रंट गुजरात संमेलनात सेमिकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते.
● गुजरात मध्ये मायक्रोन कंपनीने केलेली गुंतवणूक देशात सेमिकंडक्टर पर्यावरण तयार करण्यामध्ये महत्वाचे पाऊल असल्याचेही ते म्हणाले.
● सेमिकॉन विषयातल्या आघाडीच्या मायक्रॉन कंपनीने आयआयटी गांधीनगर मध्ये सेमिकंडक्टर उद्योगासाठीचं संशोधन केंद्रही उभारावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली
■ स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह 2024 चे आजपासून आयोजन
● स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह 2024 चे आजपासून (11 जानेवारी) आयोजन करण्यात आलं असून यामध्ये देशातील स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि इतर भागधारकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
● वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
● देशाच्या स्टार्टअप क्षेत्रातील नवकल्पना वाढवण्यासाठी, स्टार्टअपला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक सक्षम परिसंस्था तयार करण्यासाठी 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला होता.
● गेल्या काही वर्षांपासून देशातील स्टार्टअप परिसंस्था सक्षम होत असून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2016 च्या अवघ्या चारशे स्टार्टअप्सच्या तुलनेत 1 लाख 17 लाख हजारांवर गेली असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितले आहे
■ पापुआ न्यू गिनीमध्ये आज आणीबाणी जाहीर
● पापुआ न्यू गिनीमध्ये आज आणीबाणी जाहीर करण्यात आली. पॅसिफिक बेट राष्ट्रात दंगलीत 16 जणांचा मृत्यूनंतर सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होते.
● पोलिस आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचारांच्या पगारात काल कपात केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संप पुकारला. कमी झालेल्या पगारासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासनावर त्याचा ठपका ठेवला. राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या रस्त्यावर हजारो लोक काल आंदोलन करत होते.
■ जगरब खली कुस्ती स्पर्धेत भारताच्या अमन शेरावतला सुवर्ण पदक
● क्रोएशिया येथे सुरु असलेल्या जगरब खली कुस्ती स्पर्धा 2024 मध्ये भारताच्या अमन शेरावतने काल चीनच्या झो वानहूला नमवत 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले.
● या स्पर्धेत हे भारताचे पहिलेच पदक आहे.