10 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 10 January Current Affairs Notes

नाशिकमधे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्धाटन येत्या शुक्रवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार
● नाशिकमधे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्धाटन येत्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते देशातल्या युवकांना संबेधित करतील. 
● “MYBharat-ViksitBharat@2047- तरुणांकडून, तरुणांसाठी ” ही यंदाच्या युवा महोत्सवाची संकल्पना आहे.
● या महोत्सवाच्या काळात विविध राज्ये त्यांच्या सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन घडवतील.
● वाहतूक विषयक जागृती, पोषण आणि आहार, खादी आणि ग्रामोद्योग, स्टार्टअपची उत्पादनं, इत्यादींबाबत राज्यांच्या जनजागृती मोहिमा आणि विविध प्रदर्शनांचे स्टॉल्सही या महोत्वात असतील, असे त्यांनी सांगितले.
● स्वामी विवेकानंदाच्या सन्मानार्थ दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
● यंदा या दिनानिमित्त युवक व्यवहार मंत्रालयाचे सर्व विभाग इतर विविध सरकारी विभागांच्या जिल्हा पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. यानिमित्त देशातली प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमधे रस्ते सुरक्षा जागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

आर्टेमिस 3 मोहिमेला 1 वर्ष उशीर होणार
● अमेरिकेच्या अंतराळसंस्था नासाने त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढे ढकलली आहे.
● या निर्णयामुळं नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 4 अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन मोहिमेला सप्टेंबर 2026 पर्यंत साधारण 1 वर्ष उशीर होणार आहे. तर आर्टेमिस दोन्ही चंद्राभोवती अंतराळवीर पाठवण्यासाठी आणि जीवन समर्थन प्रणालीची चाचणीघेणारी 10 दिवसांची मोहीम तसेच सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलली जाणार आहे.

ब्रिटनमधल्या संरक्षण क्षेत्रातील उद्योग प्रमुखांसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची चर्चा.
● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांच्याशी  लंडनमध्ये संवाद साधला. यावेळी आयोजित परिषदेत संरक्षण उद्योगातील नेते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.
● या परिषदेला ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, ब्रिटन – भारत  उद्योग परिषदेचे अध्यक्ष आणि सीआयआय इंडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्रिटन मधल्या संरक्षण क्षेत्रातील  उद्योग प्रमुखांनी भारतासाठी त्यांच्या सध्याच्या आणि भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगितली.
● तसेच या परिषदेत एरो-इंजिन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन, क्षेपणास्त्र, पॉवर-पॅक आणि सागरी प्रणाली या  क्षेत्रात संयुक्तपणे कार्य करण्याविषयी  सविस्तर  चर्चा  झाली.
● दरम्यान राजनाथ सिंह यांनी आज (10 जानेवारी) लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेऊन संरक्षण, व्यापार, प्रादेशिक मुद्दे तसंच भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार आदी द्विपक्षीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली.

2023 सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचा निष्कर्ष
● नुकतेच संपलेले 2023 हे वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याचं निश्चित झाले असून मानवामुळे होणारे हवामान बदल आणि एल निन्यो हा नैसर्गिक हवामान परिणाम हे दोन घटक यासाठी मुख्यत्वे कारणीभूत ठरले आहेत.
● युरोपियन महासंघाच्या कोपर्निकस हवामान बदल सेवेने 2023 मधील जागतिक हवामानातील ठळक नोंदींचा अहवाल काल प्रकाशित केला.
● त्या अहवालात 2023 हे आजवरचं सर्वात उष्ण वर्ष होते, असा वैज्ञानिक समुदायाने एकमताने निर्वाळा दिला आहे. या वर्षात जागतिक सरासरी तापमान 14 पूर्णांक 98 अंश सेल्सियस  इतके होते, यापूर्वी 2016 मध्ये नोंदवल्या गेलेल्या विक्रमाच्या तुलनेत ते 17 शतांश अंश सेल्सियसने अधिक असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
● या वर्षी हवामानाची स्थिती एकापाठोपाठ ढासळत गेल्याने हे सर्वात अपवादात्मक वर्ष ठरल्याचे या सेवेच्या उपसंचालक सामंथा बर्गेस यांनी सांगितले.
● गेले संपूर्ण वर्षभर प्रथमच दिवसाचं सरासरी तापमान एक अंश सेल्सियस अधिक राहिल्याचंही आढळले आहे. गेल्या किमान एक लाख वर्षांत तापमानात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

शेख हसीना चौथ्यांदा प्रधानमंत्री पदाची घेणार शपथ
● आवामी लीगच्या अध्यक्ष शेख हसीना चौथ्यांदा प्रधानमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत.
● ढाका येथे आज संध्याकाळी राष्ट्रपती त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यांच्यासोबत 25 मंत्री आणि 11 राज्यमंत्री आज शपथ घेतील.
● मागील सरकारमधले 15 मंत्री पुन्हा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच दोन राज्यमंत्र्यांना मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे.
● या महिन्याच्या 7 तारखेला झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे.

भूतानच्या संसदीय निवडणूकीत माजी प्रधानमंत्री शेरिंग टबगेय यांच्या पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत
● भूतानचे माजी प्रधानमंत्री शेरिंग टबगेय यांच्या पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाने भुतानच्या संसदीय निवडणूकीत बहुतांश जागा जिंकल्या आहेत.
● भुतान ब्रॉडकास्टींग सेवेने दिलेल्या माहितीनुसार पीडीपी पक्षाने 47 पैकी 30 जागा जिंकल्या असून आता ते सरकार स्थापन करणार आहेत.
● टबगेय हे भुतानचे भावी प्रधानमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.  विरोधी भुतान टेन्ड्रेज पक्षाने 17 जागा जिंकल्या आहेत.

आशियायी रायफल पिस्तोल स्पर्धेत रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी पटकावलं 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीचं सुवर्णपदक
● आशियायी रायफल पिस्तोल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले.
● 10 मीटर एअर पिस्तोलमध्ये रिदम संगवान आणि अर्जून सिंग चीमा यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत रजत पदक मिळाले.
● 10 मीटर एअर रायफल एकेरीत रुद्रांश पाटीलने कांस्य पदक जिंकले.
● इंडोनेशियात जकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 8 पदके मिळाली आहेत.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment