1 जानेवारी दिनविशेष | 1 January DinVishesh || 1 January Important Facts

1 जानेवारी – घटना

● 1756 : निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि डेन्मार्क ने त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले.

● 1808 : अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

● 1818 : भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला.

● 1852 : बाबा पद्मनजी यांनी ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू केले.

● 1848 : महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

● 1862 : इंडियन पिनल कोड अस्तित्वात आले.

● 1880 : विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

● 1883 : पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

● 1899 : क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

● 1900 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

● 1908 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

● 1919 : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

● 1923 : चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

● 1932 : डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरु केले.

● 2002 : युरोपमधील 12 देशांसाठी युरो हे एकमेव अधिकृत चलन वापरण्यास सुरुवात. ग्रीस, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, स्पेन, लक्झेम्बर्ग, ऑस्ट्रिया, हॉलंड, पोर्तुगाल आणि आयलँड या 12 देशांनी युरो चलन वापरण्यास सुरुवात केली.

● 2022 : RCEP (Regional Comprehensive Economic Partnership) हा ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आशिया-पॅसिफिक राष्ट्रांमधील मुक्त व्यापार करार असून तो जगातील सर्वात मोठा व्यापार गट निर्माण झाला.

1 जानेवारी :- जन्म

● 1662 : पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू : 12 एप्रिल 1720)

● 1892 : स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 1942)

● 1894 : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 1974)

● 1900 : आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. 

● 1902 : भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म.

● 1918 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑगस्ट 2002)

● 1936 : साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. 

● 1943 : शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

● 1951 : अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

● 1975 : अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.

1 जानेवारी – मृत्यू

● 1515 : फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: 27 जून 1462)

● 1748 : स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.

● 1894 : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1857)

● 1944 : दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1969)

● 1955 : भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

● 1975 : उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1891)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment