1 April 2023 : Daily चालू घडामोडी Oneliner नोट्स

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (1 एप्रिल) भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झाली. ही 11 वी वंदे भारत ट्रेन आहे.
  • भारतीय रेल्वेने नुकतेच हरियाणा या राज्यात 100% रेल्वे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. 100 % रेल्वे विद्युतीकरण पूर्ण करणारे हरियाणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • राजस्थानमध्ये भारतातील दुसरे आणि जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होणार आहे. गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर मध्ये हे स्टेडियम होणार आहे.
  • नुकतेच प्रवीर सिन्हा यांची टाटा पॉवरचे MD आणि CEO म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2027 पर्यंत या पदावर राहतील. IIT दिल्ली मधून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे त्याचबरोबर ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), बोस्टन, यूएसए येथे व्हिजिटिंग रिसर्च असोसिएट आहेत.
  • नुकतेच तेलंगणा या राज्याने लेक डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत हैदराबाद आणि आजूबाजूच्या ५० पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन आणि विकास करण्याचे उद्दिष्ट आहे..
  • मार्च महिन्यात 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके वस्तू आणि सेवा कर संकलन. हे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन ठरले आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये GST संकलनाने 1 लाख 68 हजार कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
  • वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरण 2023 ची घोषणा केली.
  • सेवा आणि व्यापारी मालाच्या निर्यातीसह भारताची एकूण निर्यात 750 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली असून यावर्षी निर्यात 760 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची आशा.
  • 2030 पर्यंत देशाची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवणे आणि भारतीय रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार यावर निर्यात व परराष्ट्र व्यापार धोरणात भर
  • माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत P V सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीकांत आव्हान संपुष्टात आले.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment